मुंबईच्या घाटकोपरमध्ये दिवसा-ढवळ्या गोळीबार
BY - युवा महाराष्ट्र लाइव – घाटकोपर,मुंबई ।
घाटकोपरमध्ये दिवसा-ढवळ्या गोळीबार झाल्याची
घटना घडली आहे. सर्वोदय हॉस्पिटल परिसरात हा प्रकार समोर आला. गाडीच्या बाजूला उभ्या
असलेल्या एका इसमावर रिक्षातून आलेल्या तिघांनी गोळीबार केला. यावेळी हल्लेखोरांनी
तीन गोळ्या झाडल्या. रिक्षातुन आलेल्या तिघांनी देखील ओळख पटू नये यासाठी तोंडाला मास्क
लावला होता.
गोळी
लागल्याने जखमी झालेल्या व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यात आले पण रुग्णालयातच त्याचा
मृत्यू झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अचानक झालेल्या
या घटनेने परिसरात भितीचे वातावरण आहे. घाटकोपर पोलीस या संपुर्ण प्रकरणाची आता चौकशी
करत आहेत.



No comments