web-banner-lshep2024

Breaking News

दुष्काळ निवारणाची माहिती सादर करण्यासाठी आणखी किती वेळ हवा - हायकोर्ट

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई ।
दुष्काळ निवारणाची माहिती सादर करण्यासाठी आणखी किती वेळ हवा?, हायकोर्टचा उद्विग्न सवाल करण्यात आला आहे. दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला मुदतवाढ. देण्यात आली आहे त्यावेळी हा सवाल करण्यात आला. शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञञापत्र सादर करण्याचे निर्देश देत, सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली.

मागील सूनवणीस सरकारने वकील नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकल्यण्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे हायकोर्टाने राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यत कमी प्रमाणवर झालेल्या पावसाचा फटका हा शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर बसताना दिसत आहे. तसेच दुष्काळाला हतबल होत असलेला शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहे. त्यामुळे सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. अशातच मुंबई उच्च न्यायालयाने देखील फटकारले आहे.

No comments