web-banner-lshep2024

Breaking News

सिंहाचा वाटा आणि ढाण्या वाघाची चाल म्हणजे देवा ग्रुप फाऊंडेशन

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
महाराष्ट्रात देवा ग्रुप फाऊंडेशनकडून सामाजिक कार्य करताना आपण पाहिले व एैकले आहेत परंतू कधी भाऊ म्हणून,कुटूंबाचे सदस्य म्हणून लग्नासाठी मदतीचा हात देणारा उपक्रम हा देवा ग्रुपने राबविण्यास घेतला आहे.नेहमी सुख दुखःत धाऊन जाणारा देवा ग्रुप नात्याच्या बंधणाची जोपासणा करणारी कौटूंबिक संघटना ठरली आहे.देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजितशेठ ढोले व महाराष्ट्राचे लाडके मार्गदर्शक तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गशनाखाली ठाणे जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रात त्यांच्या पदाधिकार्‍यांनी समाजाप्रती असलेली नैतिक जोपासणी करणारी जबाबदारी सांभाळली आहे.सिंहाचा वाटा आणि ढाण्या वाघाची चाल या ग्रुपमधून पाहायला मिळत आहे.शेतकरी असो किंवा गरिब आदिवासी त्यांना निस्वार्थीपणाने मदत हीच आज सर्वसामान्यांची ढाल झाली आहे.देवा ग्रुप फाऊंदेशनकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे समाधान झाले पाहिजे त्यांच्या समस्यांवर मात करण्यासाठी सक्षम आणि एकजूट म्हणून सर्वधर्म समभाव पदाधिकारी नेहमी जोडीने सामाजिक कार्यात आपला घाम गाळण्यास तयार असतात.अशा पदाधिकार्‍यांना सुजितशेठ ढोले व तानाजीभाऊ मोरेंचा आशिर्वाद आणि अविनाश फोडसे (गोटया),प्रल्हाद पाटील(छोटया),कपिल ढोले,भुषण जाधव यांची साथ मिळत असल्याने देवा ग्रुप फाऊंडेशन आज महाराष्ट्राच्या नकाशावर दिसून येत आहे.

No comments