फटाका कारखान्यात स्फोट, मालकाचा मृत्यू
BY - युवा महाराष्ट्र लाइव - उस्मानाबाद ।
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहराजवळ फटाके बनवण्याच्या
कारखान्यात स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
जखमी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे
बोलले जात आहे. स्फोटमध्ये मयत झालेल्या व्यक्तीचे नाव फेरोज अत्तार असून ते स्वतः
या कारखान्याचे मालक होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.



No comments