ब्राझीलमध्ये अंदाधुंद गोळीबारात 11 ठार, 7 हल्लेखोरांपैकी एकाला अटक
BY - युवा महाराष्ट्र लाइव न्यूज नेटवर्क ।
दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील देशात रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी
अंधाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ब्राझीलमधील
बेलेम शहरात असलेल्या एका बारमध्ये हल्लेखोरांनी अंधाधूंद गोळीबार केला. यात 11 जणांचा मृत्यू झाला
आहेत, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्राझीलमधील बेलाम शहरात हा गोळीबार
झाला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, हल्लेखोरांनी गोळीबारानंतर
घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिक माध्यमांनुसार, एका हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली,
तर दुचाकी आणि 3 कारमधून आलेल्या सात हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याचेही या वृत्तवाहिनीने
म्हटले आहे. हा गोळीबार का करण्यात आला यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिक
तपास करत आहेत.



No comments