सासणे गावात पाणीटंचार्इ ; ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक पाणीटंचार्इ दूर करण्यात अपयशीमुळे नागरिक संतप्त
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड -
सध्याची परिस्थिती दुष्काळ ग्रस्त आहे त्यात पाणीटंचार्इ ही महाराष्ट्रात नागरिकांना भेडसावत आहे.ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्याच्या सासणे गावात पाणीटंचार्इने वाढ घेतली आहे.मुख्यंञ्यांनी टँकर गावागावात पोहोचवून पाणीटंचार्इ दुर करण्याचे आदेश दिले असताना गावातील सरपंचाशी संवाद साधला होता.परंतू सासणे गावातील सासणे ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक सदस्य यांनी पाणी टंचार्इकडे दुर्लक्ष केले असुन पाणीटंचार्इ दूर करण्यात अपयशी झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.अर्ज करूनही पाणीपुरवठा केला जात नाही.मनमानी पध्दतीने सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक वागत असून गेल्या 2 वर्षापासून कोणत्याही प्रकारे तोडगा काढले गेले नसून नागरिकांनी सुचविलेल्या उपायांना दुजोरा देऊन 14 व्या वित्त आयोगाच्या रकमेतून उपसरपंच यांच्या दारापुढे सध्या रस्त्याचे काम चालू असल्याची तक्रार तक्रारदारांनी पंचायत समिती,मुरबाड तहसिलदारांना पत्र देऊन लक्ष वेधण्याचे विनंती केली आहे.गावातील पाणीटंचार्इ ही सध्या महिलांना त्रासदायक ठरत असून सासणे ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असताना पिण्याच्या पाण्यासाठी विहीरीतील दुषित पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.उपाययोजना कागदावरच राहिली असून सार्वजनिक बोअरवेल बंद पडल्या आहेत.34 लाखाची विहीरीवरून वॉटर सप्लायर्सची योजना गावात असून सदर विहीर एप्रिल महिण्यात आटून जाते त्यात सरपंच व ग्रामसेवक हे सदर योजनेचे पाणी फक्त मार्च महिण्यात 4 दिवस देतात व वर्षभर योजना बंद असल्याचे अर्जात म्हंटले आहे.सासणे गावाच्या पाणीटंचार्इकडे गांभिर्यतेने लक्ष न घातलेल्या सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक यांच्यावर कारवार्इ करून गावातील पाणीटंचार्इ 10 दिवसाचे आत दुर करावी अन्यथा असे न झाल्यास सर्व नागरिक मुख्यमंत्री दालनात जाऊन पाणी मागणार असल्याचे पत्रात म्हंटले आहे.ा



No comments