web-banner-lshep2024

Breaking News

कल्याण च्या पत्रीपुलाच काम कासवगतीने...

BY- महेश भगत,युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण -
कल्याणच्या पत्रीपुलावर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत.कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना पूल पाडून तेथे नवीन पूल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र, या कामाला गती नाही. तर, शेजारील अरुंद पुलावर प्लास्टिकचे दुभाजक ठेवून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या पुलावर वाहतुकीचा ताण येत आहे. तसेच  बहुतेक वेळी रुग्णवाहीका पण यात आडकली जाते.जुन्या पत्रीपुलाला समांतर असलेल्या पुलाच्या सुरुवातीला काही ठिकाणी खड्डे आहेत. तसेच प्लास्टिकचे दुभाजक बेशिस्त वाहनचालकांमुळे तुटले आहे. दुभाजकाची लेनही विस्कटली आहे.पुलावरील खड्डे भरणे, दुभाजक नव्याने लावणे, याकडे वाहतूक नियंत्रण शाखा, महापालिका व राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. हद्दीचा मुद्दा न पाळता महापालिकेकडून खड्डे बुजवले जाणार होते. तसेच पुलावर मास्टिक अस्फाल्टिंग शीट टाकली जाणार होती. मात्र, ती टाकण्यात आलेली नाही.महापालिकेच्या मते राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या ताब्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास १ मे पासूनच सुरुवात केली आहे. मग, या पुलावरील खड्डे का बुजवले गेले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

No comments