web-banner-lshep2024

Breaking News

टिटवाळ्याच्या विकृत भोंदूबाबाचा जामीन न्यायालयाने फेटाळला

BY - वसंत भगत,युवा महाराष्ट्र लाइव – टिटवाळा ।
टिटवाळ्यातील बहुचर्चित भोंदूबाबा मंजू माताजीच्या कृत्याचा त्याच्याच भक्तांनी भांडाफोड केल्यानंतर बाबाने अटकेपासून वाचण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. आठवड्याहून अधिक कालावधी लोटला तरी बाबा पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याने कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज सादर केला होता. सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश डी. एस. हातरोटे यांनी भोंदूबाबाचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे भोंदूबाबाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शुक्रवारी 24 मे रोजी पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती अॅड.पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे भोंदू बाबाला अटकेचा मार्ग मोकळा झाला असून पोलीस बाबाचा शोध घेत आहेत.

1 comment:

  1. आज आपल्या लाईव वर Allrounder बातम्या टाकल्या आपेक्षा आणि देवा कडे प्रार्थना करेल की यांच्या पुढेही असाच feedback bhetel saglyan kadun

    ReplyDelete