web-banner-lshep2024

Breaking News

भुलोरी गावात आगीचे तांडव;70 घरांचे राखरांगोळी

BY - युवा महाराष्ट्र लाइव - अमरावती |

मेळघाट अंतर्गत येणाऱ्या धारणी तालुक्यातील भुलोरी गावांमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागल्यामुळे जवळपास 70 घरांचे पूर्ण राखरांगोळी झालेली येथे दिसून येत आहे. गावांमध्ये दुपारी 2 च्या सुमारास विजेच्या तारांमध्ये स्पार्किंग होऊन एका घरावर आगीचे गोळे पडल्यामुळ घर पूर्णपणे जळाले आणि त्या घराच्या बाजूला घरातील गँस सिलेंडर स्फोट झाल्यामुळे एकानंतर एक असे चार सिलेंडरचा स्फोट झाले व यामुळे पूर्ण गावांमध्ये आग हवे सारखी पलरली.या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर घरांचा नुकसान झाल आहे. घरांची पुर्ण राख झाली आहे. हवा चालत असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणावर पसरत गेली आणि त्या आगीने आपल्या आटोक्यात 70 घरांना घेतले. यामध्ये 4 बैल आणि जवळपास 15 शेळ्यांची जीवितहानी झालेली आहे. लोकांचे पूर्ण अन्नधान्य सुद्धा या आगीमुळे भस्म झाले आहे.

No comments