रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मुत्यू
BY
- महेश भगत,युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण |
कल्याणजवळ असलेल्या शहाड रेल्वे स्थानकात रूळ
ओलांडताना एक्सप्रेसची धडक लागल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर,
दुसऱया एका घटनेत २ दिवसांपूर्वी उध्दव कसरा या प्रवाशाचा रूळ ओलांडताना याठिकाणीच
लोकलच्या धडकेत मृत्यू झाला होता. शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या
दरम्यान अज्ञात रेल्वे गाडीने धडक दिल्याने उध्दव कसरा (वय २७, राहणार उल्हासनगर) अपघाती
मुत्यू झाला. तर, सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाराणसी एक्सप्रेसने धडक दिल्याने
गिरिष मेघराज कोटवानी (वय ३९, राहणार उल्हासनगर) यांचा दुर्दैवी मुत्यू झाल्याची घटना
घडली. याबाबत कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मुत्यूची नोंद केली आहे.


No comments