डोंबिवली : उड्डाणपूलावरील वाहतूक २७ मे पासून बंद
BY
- युवा महाराष्ट्र लाइव - डोंबिवली |
डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपूल
आहे. ४० वर्षापूर्वी उभारण्यात आलेला हा पूल २७ मे पासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा
निर्देश मध्य रेल्वे विभागीय प्रबंधकांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला दिला आहे.
यामुळे डोंबिवली शहरवासीयात खळबळ माजली आहे. हा पूल बंद झाला मोठी वाहतूक समस्या निर्माण
होणार आहे. मध्य रेल्वेचे अभियंते डी. डी. लोलगे यांनी पालिकेचे आयुक्त गोविंद बोडके
यांना पत्र पाठवले आहे. डोंबिवलीतील रेल्वेवरील उड्डाणपुलाचे आयआयटी मुंबई यांनी पुलाचे
स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्या अहवालामध्ये पुलाच्या दुरुस्ती संबंधी शिफारस करण्यात
आली आहे. यासाठी २७ मे २०१९ पासून पूल वाहतूकीसाठी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
ऑगस्ट २०१७ मध्येही डोंबिवलीचे स्ट्रक्चरल ऑडिटर माधव चिकोडी यांनीही पुलाचे ऑडिट केले
होते. पुलावरील जाहिरातीचे मोठे फलक तातडीने काढण्याची सूचना त्यांनी केली होती. पुलाला
काही ठिकाणी राजाजी पथाच्या दिशेला तडे गेले होते, त्याची दुरुस्ती करण्यात यावी. पुलावरील
गवत काढून टाकावेस, अशा सूचना केल्या होत्या. उड्डाणपूलावरील वाहतूक २७ मे पासून बंद
केली तर, डोंबिवलीत वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे.


No comments