अरुणाचल प्रदेशमध्ये आमदारासहित ९ जणांची गोळ्या घालून हत्या
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली ।
अरुणाचल प्रदेशमधील एका आमदारासहित ९ जणांची
गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तिरोंग अबोह असे त्या आमदाराचे
नाव आहे. ते नॅशनल पीपल्स पक्षाचे नेते आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री
कोनार्ड संगमा यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. अबोह यांच्या कुटुंबातील काहीजण,
त्यांचे सुरक्षारक्षक आणि वाहनचालकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार
एनएससीएन (आयएम) यांच्याकडून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.


No comments