जेएनपीटी बंदराचे 1300 कामगार, 24 मे पासून बेमुदत संपावर
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – रायगड ।
24 मे पासून जेएनपीटी बंदरात बेमुदत संप करण्याचा इशारा जेएनपीटी
बंदरातील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येत मंगळवारी घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेतून
दिला आहे. स्थानिकांच्या हक्कांची पायमल्ली होऊ नये, यासाठी बंदराला आवश्यक असलेल्या
347 रिक्त पदांवर स्थानिक प्रकल्पग्रस्तांनची त्वरित भरती करावी. यासाठी हा संप पुकारण्यात
आला आहे.
तसेच बंदरातील अधिकारी पदावरील नोकरभरती केली जात असताना, केवळ प्रकल्पग्रस्तानवर राग
काढण्यासाठीच जेएनपीटीचे प्रशासन चौथ्या आणि पाचव्या श्रेणीच्या नोकरभरतीला, सातत्याने
लाल बावटा दाखवत असल्याचा निषेध म्हणून, हा बेमुदत संपाचा इशारा देत असल्याचे या पत्रकार
परिषदेतून जाहीर करण्यात आले आहे.



No comments