ड्रग्ज तस्करी करणारी पाकिस्तानी बोट पकडली
BY
- युवा महाराष्ट्र लाइव न्यूज नेटवर्क ।
भारतीय तटरक्षक दलाने ड्रग्जतस्करी करणारी अल मदिना ही पाकिस्तानी बोट पकडली आहे. या बोटीतून तब्बल 600 कोटी रुपये किमतीचं 200 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. या कारवाईत 13 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पाकिस्तानची मासेमारी करणारी बोट भारतीय सागरी हद्दीत
शिरल्यानंतर भारताचे तटरक्षक दल सज्ज झाले. तटरक्षक दलाने संशयावरून या बोटीची झडती
घेतली असता बोटीतून अंमली पदार्थांची 194 पाकिटे आढळून आली. भारतात वितरित करण्यासाठी
येणारे तब्बल 200 किलो ड्रग्ज तटरक्षक दलाने पकडले आहे. गुजरात कोस्ट गार्डची ही सर्वात
मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.



No comments