web-banner-lshep2024

Breaking News

कर्जत मुरबाड राज्यमार्गावर गळफास घेऊन आत्मत्या

BY - युवा महाराष्ट्र लाइव - रायगड |

रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्जत मुरबाड राज्यमार्गावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुजाता तनावडे या एपीआय नवनाथ जगताप , पीएसआय शरद देठे ,पोलीस नाईक अशोक राठोड यांच्या सहित घटनास्थळी पोहोचल्या आणि मृतदेहाची पाहणी केली असता आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.सविस्तर वृत्त असे कि प्रभाकर गणपत वाघमारे 52 हा काही दिवस बायकोच्या निधनामुळे दुखी होता . तो सद्या वंजार वाडी येथे राहणाऱ्या त्याच्या मुलीकडे आला होता तसेच त्याला दारूचेही व्यसन होते . याच नशेत त्याने शुक्रवारी रात्री कडाव पासून काही अंतरावर असलेल्या मुरबाड राज्य मार्गालगतच्या वडाच्या  झाडाच्या पारंब्यांच्या साह्याने गळफास घेतला . पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून.पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.

No comments