web-banner-lshep2024

Breaking News

मोहोळ येथील विहान हॉस्पिटलचे डॉ सत्यजित मस्के यांच्यावर न्यायालभात आठ दिवसांनी गुन्हा दाखल

BY - युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मोहोळ
गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडलेल्या विहान हॉस्पिटलचे डॉ. सत्यजित मस्के यांच्यावर मोहोळ येथील न्यायालयात आज सोमवार दि. ११ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता गुन्हा दाखल झाल्याची माहिती अॅड  . रामेश्वरी माने यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
मोहोळ येथील गर्भलिंग निदान प्रकरणाने मोहोळ तालुक्यासह संपुर्ण  जिल्हयाचे वैद्यकिय क्षेत्र हादरले आहे . दरम्यान . सोमवारी पीसीपीएनडीटी कायदयान्वये
खटला दाखल करण्यात आल्याची माहिती प्रसार माध्यमांना सांगितले. दि. ०३ मार्च रोजी जिल्हा पीसीपीएनडीटी पथकाने सापळा लावून गर्भलिंग निदान करताना डॉ. मस्के यांची सहकारी यांनी गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. बुधवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मोहोळ न्यायालयात हजर केले होते.वास्तविक पाहता सरकारी कामात अडथळा करणे व गर्भलिंग निदान करणे या दोन भिन्न धटना आहेत.त्यापैकी सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी डॉ .सत्यजित मस्के, व यांची सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल असून ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत.


No comments