महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान
BY
- युवा महाराष्ट्र लार्इव्ह - नवीदिल्ली
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
यांच्या हस्ते आज नाट्यकर्मी प्रा. वामन केंद्रे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रविंद्र व डॉ. स्मिता कोल्हे आणि गायक शंकर महादेवन
या महाराष्ट्रातील मान्यवरांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार
हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील मान्यवरांना
पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ
सिंह, गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


No comments