web-banner-lshep2024

Breaking News

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांची पत्रकारपरिषद

BY - सरिता नार्इक,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - ठाणे
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे ठाणे जिल्ह्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन केले जाईल अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
१९५० हेल्पलाईन, सी व्हीजिल मोबाईल एप, भरारी पथके, सीसीटीव्ही यंत्रणा अशा विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखरेख व नियंत्रण ठेवले जाईल.   राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना देखील याबाबतीत अवगत करण्यात आले आहे असे सांगून त्यांनी पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय असून निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका होतील असा विश्वास व्यक्त केला.
      ठाणे जिल्ह्यात २३-भिवंडी, २४-कल्याण आणि २५-ठाणे असे ३ लोकसभा मतदारसंघ आहेत. आणि याठिकाणी २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे.या पत्रकार परिषदेस ठाण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, भिवंडीचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे, कल्याणचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने , उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर उपस्थित होत्या.  



No comments