web-banner-lshep2024

Breaking News

मराठा मावळा संघटनेच्या मुख्य कार्यालयावर भ्याड हल्ला

BY - नितिन पुंडे,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - पुणे

गरिबांसाठी व शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढणाऱ्या मराठा मावळा संघटनेचे संथापक व अध्यक्ष श्री माणिकराव शिंदे पाटील ह्यांच्या संघटनेचे केंद्र मानले जाणारे सभांजी नगर येथील मुख्य कार्यालयावर काही भ्याड हल्लेखोरांनी दिनांक 9 मार्च रोजी कार्यालय बंद असताना रात्री 8 वाजता हल्ला केला.
महाराष्ट्र भर असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ह्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत आहेत व घडलेल्या घटनेचा पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून हल्लेखोरांना अटक करावी ह्या साठी मराठा मावळा संघटन महाराष्ट्र राज्यातील  सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आप आपल्या जिल्हातील कमिशनर ऑफिसला निवेदन देत  आहेत व आपला जाहीर निषेध पण दर्शवून हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत

No comments