चहावाल्याच्या मदतीला तो धावून आला आणि.......!
BY
- गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड
महाराष्ट्राची पारदर्शक वृत्तवाहिनी टिव्ही
9 मराठी या ऑफिसचा कॅन्टीन बॉय संजय उर्फ संजू काही दिवसांपुर्वी त्याचं वॉलेट चोरीला
गेलं जे कधीच सापडलं नाही.१६ हजार होते त्यात ना आरोपी सापडला ना पैसे सोबत भ्रमनिरासही
झाला की, ‘हा शहर तुम्हाला कधीच निराश करत नाही.’ मुंबईत नोकरीच्या शोधात १८०० किलोमिटर
दूर, घर दार सोडून संजू आला, पण मायानगरीच्या बकासूराने त्याला सावज केलंच बहिणीचं
लग्न तोंडावर आलेल्या भावाला विचारा लग्नाच्या तोंडावर जेव्हा खिश्यावर विघ्न येतं,
तेव्हा काय अवस्था होते.
१६
हजार गेले संजू बेजार झाला, डोक्यात एकच विचार बहिणीचं लग्न.....! संजूसोबत घडलेली
ही ट्रॅजडी टिव्ही 9 मराठी ऑफिसमध्ये चर्चेचा विषय ठरली... आणि पाहता पाहता एक मोहिम
बनली. व्हॉटसअॅपवर टिव्ही 9 मराठीचे हेड विरेंद्र घूनावत यांनी संजूला सहखुशीनं आर्थिक
मदत करा अशा आशयाचा एक मेसेज पोस्ट केला,ज्याला चॅनलच्या इनपुट आणि आऊटपूटचा उत्सफुर्त
प्रतिसाद मिळाला, एक मोठ्ठी रक्कम गोळा झाली एरवी चहासाठी चारणे मोजणा-यांनीही मदत
केली त्यांचं विशेष कौतूक....!
दिनांक
११ मार्च रोजी ही रक्कम एका खाकी लिफाफ्यात चैनलचे एडीटर रोहित विश्वकर्मा यांनी स्वताच्या
हाताने संजूकडे सुपुर्त केली. यावेळी टिव्ही 9 मराठीचे क्रार्इम सिन एडिटर गिरीश गायकवाड
यांनी रिक्वेस्ट करून हा क्षण कॅमे-यात टिपला चॅनलच्या एडिटरने चहावाल्यासाठी वेळ काढणं,
त्याची विचारपूस करणं खुप मोठी गोष्ट आहे.विरेंद्र घुनावत यांनी संजूसाठी ऑल द बेस्टचा
कॉल दिला. अनेकांनी टाळ्या,शिट्टी वाजवली. टिव्ही 9 मराठी न्युजरुमचा माहौलच बदलून
गेला.संजूच्या चेह-यावरचे भाव शब्दात मांडता येत नाहीयेत तो हसत होता पण मला त्याचे
डोळेच दिसत नव्हते.ते पाणावलेले होते तो निधून गेला.
गेल्या
५ वर्षांपासून मी क्राईमच्या बातम्या लिहीतोय राजरोसपणे होणारे गुन्हे, रेप, मर्डर,
चोरी, दरोडा आणि विश्वासघाताच्या बातम्या नित्याच्याच झाल्यत असं वाटू लागलंय की जगात
माणुसकी साफ मेलीये माणसं एकमेकांच्या संपर्कात फक्त यासाठीच आहेत कारण, त्यांना त्यांच्या
गरजा पुर्ण करायच्या आहेत वर मांडलेला हा सगळा घटनाक्रम माझ्या डोळ्यासमोरच घडला, त्यामुळे
प्रत्रकारीतेच्या भाऊगर्दीत माणुसकी जपणारे, मदतीसाठी धावून जाणारे, पुढाकार घेणारे,प्रॉब्लेमचं
सॉल्युशन शोधणारे पाहिले की “स्कारलेट जोहॅनसन्स”ला प्रत्यक्षात पाहील्याचा आनंद होतो.
कवी कुसुमाग्रजांची कविता आठवते, “पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा”असे रियल लाईफ हिरो
सगळ्यांना मिळु देत हीच मापक अपेक्षा. असल्याचे टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीचे क्रार्इम
सिन एडिटर गिरीश गायकवाड यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.जगात अजुनही माणूसकी
ही जागृत आहे.हे या घटनेतुन समजत आहे.



No comments