भास्कर विशे यांच्या वाढदिवासानिमित्त खर्डी ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळांचे वाटप
देवा ग्रुप फाऊंडेशनचे कसारा,खर्डी विभगाचे अध्यक्ष भास्कर विशे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शहापूर तालुक्यासह कसारा,खर्डी विभागातील ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.नेहमी गोरगरिबांच्या सेवेसी सदैव तत्पर असणारे भास्कर विशे यांच्या समजसेवेच्या कारकिर्दीचा लेखा जोखा आज प्रत्येक तरूणवर्गाच्या व नागरिकांच्या मुखावर आहे.
प्रत्येकाला आपल्या कुटूंबातील सदस्य माणून जनसेवेचा मुख्य भाग भास्कर विशे यांच्या आयुष्यात मौल्यवान ठरला आहे.त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठया प्रमाणातील तरूणवर्ग,समाजसेवा,नागरिकांसह देवा ग्रुप पदाधिकारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
ग्रामीण रूग्णालयात फळे वाटप करताना देवा ग्रुप फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे सचिव तानाजीभाऊ मोरे,अविनाश फोडसे(गोटया),प्रफुल पाटील(छोटया),कसारा विभागाचे उपसरपंच रमेश भोर्इर,गोलभनचे उपसरपंच पंडीत घरत,शिरोळ उपसरपंच सचिन निचिते,भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर जाधव,आदिवासी प्रकल्प अध्यक्ष असोक एरनाक,कुणबी समाज उन्नती संघ खर्डीचे अध्यक्ष प्रकाश सांडे,नवनाथ भोर्इर,सचिन उंबरगोंडे,विनोद हरड,सचिन ठाकरे,मॅक्स चंदे,बाळा भोर्इर,अनिल मडके,ग्रामीण रूग्णालयातील सर्व डॉक्टर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थित होती.
त्याचबरोबर देवा ग्रुप फाऊंडेशनचे खर्डी विभाग पदाधिकारी व त्यांचे स्नेही मित्र परिवार यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.






No comments