मुरबाड तालुक्यातील तीन किल्ल्यांवर दुर्ग पुजा संपन्न
BY –युवा महाराष्ट्र लार्इव्ह – मुरबाड -
मुरबाड तालुक्यातील गोरखगड, मच्छिंद्रगड व सिद्धगड या किल्ल्यांवर रविवारी (दि. २४) दुर्ग पुजा करण्यात आली.पुरातन किल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण करणाऱ्या शिवाजी ट्रेल व मुरबाडकर ट्रेकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या पूजेचे आयोजन केले होते.
देशातील १३१
व त्या पेक्षा
जास्त किल्ल्यांवर दुर्ग
पुजेचे आयोजन करण्यात आले
होते.
किल्ले
गोरखगड येथे मुरबाडकर ट्रेकर्सच्या सदस्या
अंकिता पष्टे यांच्या हस्ते
गोरक्षनाथ मंदिरात आरती करून दुर्ग
पुजा करण्यात आली.
तर मच्छिंद्रगडाच्या पायथ्याला समोर
दिसणार्या मच्छिंद्रगडाच्या सुळक्याचे पुजन
कुसुम विशे यांनी
केले. किल्ले सिद्धगड येथिल
मुख्य दरवाजा अर्थात
दिंडी दरवाजा सुशोभित केला.
दिपक विशे व
विनोद आघाणे यांनी
दरवाजाची पुजा करून दिपोत्सव साजरा
केला. अशाप्रकारे या
तीनही किल्ल्यांवर दुर्ग
पूजनाचा कार्यक्रम पार पडला.



No comments