web-banner-lshep2024

Breaking News

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश उल्हासनगर रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष


BY – सरिता नार्इक,युवा महाराष्ट्र लार्इव्ह – उल्हासनगर -
रेल्वे प्रवाशांसाठी आता स्थानकावर घातपात झाल्यास जागीच आपत्कालीन वैद्यकीय कक्षाची व्यवस्था सुरू झाली आहे.खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे उल्हासनगर रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा शुभारंभ रविवार दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता उल्हासनगर रेल्वेस्थानक प्लॉटफार्म क्रमांक 2 उल्हासनगर पूर्व येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडला.या आरोग्य तपासणीची फि केवळ 1 रूपया असणार आहे.यावेळी विविध श्रेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते ,प्रवाशी मोठया संख्याने उपस्थित होते.

No comments