२६ फेब्रुवारी मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात "लोकजागर महाराष्ट्राचा"
BY – युवा महाराष्ट्र लार्इव्ह – ठाणे -
कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे ,सीकेपी सोशल
क्लब आणि ज्ञातिगृह ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला
मंगळवार दि २६ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ५:३० वा सीकेपी हॉल खारकर आळी एन के टी
कॉलेज जवळ ठाणे येथे महाराष्ट्राच्या लोककलांवर आधारित "लोकजागर महाराष्ट्राचा"
आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते संकल्पना लेखन-दिग्दर्शन
निवेदन सदानंद राणे ,लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे त्यांच्या सोबत २० कलावंत अभ्यासपूर्ण
निवेदन , गणगवळण ,पोवाडा, भारुड, लावणी, जोगवा यासह भरपूर मनोरंजन करणार आहेत, गायिका
मनीषा वायंगकर ,मनीषा बांगर, नीलिमा सबनीस ,सुप्रिया यंदे ,रुचिता कांबळे असणार आहेत
विशेष उपस्थिती सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले , महेश केळुसकर केंद्रीय अध्यक्ष कोकण
मराठी साहित्य परिषद ,सुधाकर वैद्य अध्यक्ष अखिल भारतीय चां, का,प्रभु मध्यवर्ती संस्था
उपस्थित राहणार आहेत.



No comments