चौकी आहे पण पोलीसच नाहीत उल्हासनगरमधील घटना
BY - सरिता नार्इक,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - उल्हासनगर
उल्हासनगरमधील सुभाष टेकडी हा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वादविवाद घटनांमुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आपल्या तक्रारी त्वरीत पोलिसांकडे देता यव्यात यासाठी येथे पोलीस चौकी उभारण्यात आली होती. सुरूवातीचे काही दिवस याठिकाणी पोलीस नेहमीच हजर राहत होते. पण मध्यंतरीच्या काळात या चौकीत कोणच येत नसल्याचे निदर्शनात आले आहे. रविवारी दुपारी ३ च्या दरम्यान काही महिलांनी मोबाईल चोराला पकडून सुभाष टेकडी पोलिस चौकीत आणले. पण, चौकीत पोलीस नसल्यामुळे जवळपास १ तास त्या चोराला महिलांनी त्या पोलिस चौकीत बसवून ठेवत विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना चौकीत त्वरीत पाठविण्यास सांगितले. या अनुभवातून पोलिसांनी धडा घेत भविष्यात या चौकीत पोलीसांची हजेरी राहील हीच अपेक्षा येथील नागरिक करत आहेत.


No comments