मुरबाड ते कल्याण जादा बस उपलब्ध करा अन्यथा बस डेपो मधील एकही बस बाहेर निघु देणार नाही - गौरव शेलार
BY - युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड
नुकतेच मुरबाड मामनोली रस्त्यावर कालीपीली जिप
व पिकअपच्या धडकेत चालक व अन्य 2 ते 3 जणांचा मृत्यु झाला असुन या संबधित अपघाताला
आरटीओ व मुरबाड आगार बस डेपो जबाबदार असल्याचे राष्ट्रीय जनगण पार्टी राजपाचे प्रदेशाध्यक्ष
गौरव शेलार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.मुरबाड
कल्याण हा रस्ता आता मृत्युचा घाट बनत चालला आहे.या घटनांना आळा घाल्याणस आरटीओ अधिकारी
सुध्दा लाचार होऊन भ्रष्ट झाल्याचे या घटनेतुन दिसुन येत आहे.मुरबाड तालुक्यात किती
विनापरवाने जिप आहेत त्यांची मर्याद किती आहे हे तपसील करण्यास मात्र हे लाचार अधिकारी
कानडोळे करत आहेत.तसेच संबधित घटनेला मुरबाड आगार बस डेपो सुध्दा तितकेच जबाबदार आहेत.जर
मुरबाड तालुक्यात जादा बस उपलब्ध झाल्या तर हे आपघाताच्या घटना मात्र नक्कीच थांबतील
असे येथील जनता सुध्दा आपल्या चर्चेतुन व्यक्त करत आहेत.जर येत्या 15 दिवसात मुरबाड
आगार बस डेपोतुन जादा बस उपलब्ध न झाल्यास राष्ट्रीय जनगण पार्टी तिव्र आंदोलन करून
बस डेपो मधुन एकही गाडी बाहेर निघु देणार नाही असे राजपाचे प्रदेशाध्यक्ष गौरव शेलार
यांनी यावेळी बोलताना सांगितले.कालीपीली जिपवाले आपले फेरी वाचवण्यासाठी हे धुम स्टार्इलने
गाडया चालवतात व हया गाडीमध्ये बसणारा प्रवाशी हे आपले जिव मात्र मुठीत घेऊन बसत असतो
कारण नामुसकीने बस नसल्याने त्यांना या जिवघेण्र्या धुमस्टार्इलखोरांच्या गाडीचा वापर
करावा लागतो.हेच जर मुरबाड आगार बस डेपोने गाडया जादा उपलब्ध करून दिल्या तर कुठे तरी
आपघाताला आळा बसल्याशिवाय राहणार नाही.याकडे आता परिवाहन मंत्री यांनी लक्ष घालण्यासाठी
राष्ट्रीय जनगण पार्टी निवेदन देणार असल्याचे यावेळी शेलार यांनी सांगितले आहे.



No comments