मुरबाड श्री सार्इ सेवक मित्र मंडळाची पालखी सोहळा श्रीक्षेत्र शिर्डीकडे करणार प्रस्थान
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड
सालाबाद प्रमाणे यंदाही मुरबाड शहरातील श्रीसार्इ
सेवक मित्र मंडळ मुरबाड तालुका पालखी मंगळवार दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी सार्इ मंदिर
सार्इ संसार मुरबाड येथुन शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे.तसेच
या पालखी सोहळयात विविध श्रेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.मंगळवार दिनांक
30 ऑक्टोंबर रोजी श्रीक्षेत्र शिर्डीकडे पोहचणार असुन बुधवार दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी
सकाळी 7 वाजता मुरबाडकडे प्रस्थान होणार असुन कुणबी समाज हॉल मुरबाड ते श्रीसार्इ मंदिर
सार्इ संसार मुरबाड श्री सार्इ पालखी भव्य मिरवणूक सोहळयाचे आयोजन केल्याचे पालखी सोहळयांच्या
पदाधिकारी यांनी युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.


ॐ साई राम कुणाल जी
ReplyDelete