मुरबाड म्हसा कर्जत रस्त्याची र्इडी मार्फतची चौकशी ; कर्जत उपअबियंताचे पनवेल कार्यकारी अभियंताला पत्र
BY, नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - ठाणे -
मुरबाड म्हसा कर्जत 18 कि.मी रस्त्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी र्इडीमार्फत करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली होती परंतू गेल्या तीन वर्षापासून तपासात चालढकल सुरू असुन ठेकेदारानी अधिकार्यांना मॅनेज करून बिले काढली आहेत मात्र,रस्त्याचा काम अद्दयापही पुर्ण झालेला नाही.
या कामाची चौकशीचे पत्र ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाला दस्ताएैवजी कर्जत उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याने कर्जत उपविभागाने कार्यकारी अभियंता पनवेल यांना पत्राने कळवून कर्जत उपविभागात पत्र उपलब्ध नाहीत,आपण र्इडीकडे रस्त्याचे कागदपत्र पाठवावे असे कळविले आहे.
मुरबाड म्हसा पाठगांव येथील 18 किलो मीटर रस्ता एन.ए.कंन्स्ट्रक्शन मुंबर्इ यांनी 36 कोटीचा ठेका घेतला आहे परंतू या रस्त्याच्या कामावर 50 कोटीचा निधी अतिरीक्त बोगस कामे दाखवून काढले आहेत.सदर मुरबाड कर्जत रस्त्यावर राष्ट्रीय नॅशनल हायवे शहापूर कर्जत हायवे म्हणून 2200 कोटीचा टेंडर गेल्यावर्षी मंजूर झाला आहे.एकाच रस्त्यावर 2013-14 पासून 2017-18 पर्यंत वेगवेगळे टेंडर काढून शासनाचा निधी घोटाळा केला आहे.यामध्ये बांधकाम मंत्री वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशय असून या कामाची आता सि.बी.आय मार्फत चौकशी करावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी पंतप्रधानाकडे केली आहे.मुरबाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे ज्युनियर इंजिनियर डोंगरे,वाघ तसेच उपअभियंता,कार्यकारी अभियंता,अधिक्षिक अभियंता,गुणवंता विभागाचे अधिकारी यांचा या भ्रष्टाचारात समावेश आहे.सार्वजनिक बांधकाम उपविभागांनी सन 2013-2014 ते 2017-2018 कालावधीत एकाच रस्त्यावर दरवर्षी कामे दाखवून निवीदा काढून कोटीचा भ्रष्टाचार केला आहे.क्रमशः


No comments