आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावतीने युवा सेवा फाउंडेशनला१ लाख रु धनादेश स्वरूपात देणगी
BY, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुंबई
शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या २८ व्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज मातोश्री येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. महालक्ष्मी देवीला आ.डॉ.गोऱ्हे यांच्यावतीने श्री आदित्यजी यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी पूजा करण्यात आली होती. त्याचा प्रसाद यावेळी श्री आदित्यजी यांना व शिवसैनिकांना व युवासैनिकाना देण्यात आला. तसेच आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी युवा सेवा फाउंडेशनला देणगी स्वरूपात १ लाख रु धनादेश दिला. युवा सेवा फाउंडेशनच्या वतीने सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक सामाजिक ऊपक्रम राबविले जात आहेत.त्यामध्ये कॉलेज व शाळेत मुलींसाठी अत्यल्प दरात वेळ सॅनिटरी वेडिंग मशिन लावून नॅपकिन्स उपलब्ध करून देणे या ऊपक्रमाचाही समावेश आहे.



No comments