८ लाखांची लाच स्वीकारताना कल्याण डोबिंवली महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय घरत याला अटक
भ्रष्टाचाराचे माहेरघर अशी ओळख असलेल्या कल्याण डोबिंवली
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय घरत याला ठाणे लाचलुचपत विभागाने ८ लाखांची लाच
स्वीकारताना अटक केली आहे. या घटनेने पालिका अधिकारी–कर्मचारी वर्गात एकच खळबळ
उडाली आहे. संजय घरत हा वादग्रस्त अधिकारी असून, त्याने तक्रारदाराकडे ४२ लाखांची
लाच मागितली होती.त्यातील ८ लाखांचा पहिला हप्ता घेताना एसीबीने त्याला अटक केली
आहे.


No comments