web-banner-lshep2024

Breaking News

" माणसातील माणूस " मुरबाडचे गुरूवर्य तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेे अजित (आबा) तेलवणे...

BY, कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड  - 
" माणसातील माणुस " हरवला होता परंतू ते म्हणतात ना देव माणसामध्ये आहे आणि देवाला प्रत्येकाकडे जाता येत नाही म्हणून देवाच्या रूपात या धरतीवर गुरूवर्यानी देव रूपात जन्म घेतला आहे.असेच माणसातील देव मुरबाडच्या मातीत गुरूवर्य रूपात लाभले आणि त्यांच्या पराकष्टाने मुरबाडचे नाव महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर कोरले.असा मुरबाडचा हिरा,मुरबाडच्या मातीतील देव माणूस म्हणून अजित (आबा) तेलवणे यांची ख्याती महाराष्ट्राला माहितीच आहे.हिरा तर चमकतो परंतू त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक कार्याबरोबर समाजसेवेची भुमिका त्यांनी तमाम जनतेच्या मनात चमकवली.अतिशय मनमळाऊ,शांत स्वभावाचे,प्रत्येक बाबीवर बारकार्इने लक्ष देऊन अभ्यास करत हजारो लोकांचे प्रश्‍न आपल्या कार्याने सोडवले आहेत.मुरबाडच्या गरिब मुला र् मुलींना शिक्षण मिळावे म्हणून न्यू इंग्लिश स्कूल शाळा सुरू केली.या मध्ये काही गरजूंना तर मोफत शिक्षण तर काही गरजू मुला मुलींना कमी फी मध्ये शिक्षण दिले.त्यांच्या आशिर्वादाने मुरबाडच्या मातीतून कित्येक विद्दयार्थी घडले.काही शासकीय पत्रकार,डॉक्टर,इंजिनिअर,वकील,सरकार अधिकारी,पोलिस झाले एवढेच नव्हे तर अजित आबा तेलवणे यांच्यासारखे गुरूवर्य लाभल्याने मुरबाडच्या मातीतील कित्येक तरूर्णतरूणी अमेरिका,चीन,जपान,जर्मन,लंडन सारख्या देशात आज मोठया हुद्दयावर काम करत आहेत.केवळ शिक्षण देऊन विद्दयार्थी घडत नसतो तर शिक्षणाला शिक्षकांची जोड व गुरूची साथ असावी लागते.अशीच जोड अजित (आबा) तेलवणे यांची मिळत आहे. हजारो तरूणांना त्यांच्या रूपात गुरूवर्य लाभले आहे.समाजसेवेच्या रूपात अजित (आबा) तेलवणे हे नेहमी स्वतःचा विचार न करता सामान्यांचा विचार करतात.माणूस जरी माणसापासून लांब गेला तरी माणसाच्या मनातुन संस्कार,परंपरा लांब गेली नाही.त्यांचे सकारात्मक विचार मुरबाड तालुक्यातील सर्व जनतेला आवडणारे असून समाजसेवकाच्या रूपात जणू या हिर्‍याने मुरबाड तालुक्याला वेगळीच चमक दिल्याने मुरबाड तालुक्याचा शेतकरी मुलगा आज शिक्षणात यश संपादन करत गरूड झेप घेत चमकत आहे.अशा कर्त्तृत्ववान गुरूला भेटण्यास आजही तालुका,महाराष्ट्रातून,विदेशातुन त्यांचे विद्दयार्थी आतुरतेने भेटण्यास येत आहेत.
           तर दुसरीकडे मुरबाडच्या राजकारणात अजित (आबा) तेलवणे यांचा सिंहाचा वाटा आहे.कारण आबा हे भाजपा पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून त्यांनी कधीही पक्षाला मध्ये न आणता प्रत्येकाला आपले मित्र केले आहेत.आबा हे नाव एैकताच माणसातील माणूस म्हणून ओळख समोर येते.शिक्षणाला व राजकारणाला कधीही एकत्रीत न करता दोन्ही बाजूंना वेळात वेळ देऊन समाजसेवक म्हणून आज त्यांची ख्याती जगासमोर आली आहे.विद्दयार्थ्यांना शिक्षणात घडवले परंतू राजकारणात पडू दिले नाही तसेच राजकारणात काही ठिकाणी काही जणांना राजकारणी अभ्यास कमी पडत होते तेव्हा राजकारणी अभ्यास राजकारणांना त्यांच्या विचारातून त्यांच्या प्रकटीकरणातून करून दिले.आजही आबांना फोनवर एखादयासाठी मदतीची अपेक्षा जरी केली तरी त्यांच्या मदतीला पुर्णतः प्रतीसाद देणारे आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ कार्यकर्तेे अजित (आबा) तेलवणे यांनी आपल्या आयुष्यातील अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य जनसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या सेवेसाठी अर्पण केले आहे आणि हेच मुरबाडकरांचे भाग्य कि मुरबाडच्या मातीत अशा भुमिपुत्राने जन्म घेतला.जसे सुर्य उगवणे सोडत नाही तसेच आबांचे सामाजिक कार्य काही थांबत नाही.प्रत्येक कार्यात त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव कार्याला तेजस्वी बनविते.अशा भुमिपुत्राने सर्वांच्या मनात घर केल्याने त्यांची जागा कोणी घेऊ शकणार नाही आणि हेच दुधाहुनी पांढरे सत्य आहे.

No comments