web-banner-lshep2024

Breaking News

मुलींची शाळाचे पुनर्जीवन करण्यासाठी परवानग्या देऊन मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करणार - विश्वनाथ महाडेश्वर-महापौर

BY, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुंबई
गिरगाव येथील नाना जगन्नाथ शंकरशेट मुलींची मराठी शाळा ही मोडकळीस आल्याची माहिती मा.नाना शंकरशेट प्रतिष्ठानकडून देण्यात आली होती. त्यानुसार दि ८ जून रोजी सकाळी आ. डॉ नीलम गोऱ्हे यांनी या शाळेची पाहणी केली होती याबाबत आज दि. १४ जून, २०१८ रोजी विश्वनाथ महाडेश्वर महापौर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या शाळेच्या विविध समस्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. शाळेची इमारत धोकादायक असल्याचे कारणे देते प्रश्नांवर शाळेचे पाणी व वीज बंद करण्यात आली आहे. यामुळे इमारत दुरुस्ती करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. शाळेची इमारत तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याने इमारतीची दुरुस्ती करून जतन करण्यासाठी आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पाणी व वीज सुरू करण्याकडे मा. महापौरांचे लक्ष वेधले . यावेळी तात्काळ महापौर महाडेश्वर यांनी प्रशासनास पाणी व वीज चालू करून शाळा प्रशासनास बांधकाम परवानगीबाबत  सहकार्य करण्याचे आदेश दिले. 
आ.डॉ.गोऱ्हे यांनी या शाळेची पाहणी केल्यानंतर शाळेच्या शेजारी असलेल्या प्ले ग्राउंड ८ फूट उंची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. याबाबत प्रशासनास प्ले ग्राउंड ची उंची किती असली पाहिजे? त्याठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत का? याबाबत नीलमताईंनी  प्रश्न उपस्थित केले परंतु उपस्थित अधिकारी वी. साठे यांना बाबत माहिती देता आली नाही. महापौर व  आ.डॉ.गोऱ्हे यांनी सध्या बांधलेली  असलेली ८ फूट उंच भिंत पडून टाकावी व मुलींना सोयीस्करपणे वावरत येईल अशा प्रकारची भिंत उभारण्याची सूचना केली व ती त्यांनी मान्य करून सात दिवसात काम पूर्ण करू असे सांगितले. या कामाची पाहणी आ.डॉ.गोऱ्हे व महापौर हे पुढील आठवड्यात करणार आहेत.
आ.डॉ.गोऱ्हे यांना शाळेच्या शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेले असल्याचे पाहणीच्या वेळी दिसून आले होते. याची सफाई दररोज करण्यात येईल असे आश्वासन ही मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले. शाळा परत बांधून मुलींचे शिक्षणासाठी परत वापरात येणे व मैदान खुले होणे याबाबत थेट निर्णय महापौरांनी घेतल्याबाबत  याबैठकीचा फार ऊपयोग झाला सांगून सर्व शाळेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले व आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, सभागृह नेत्या-विशाखा राऊत,श्री.बाळा नर, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, पराग मसुरकर-सहाय्यक आयुक्त (मालमत्ता), शिक्षणाधिकारी महेश पालकर, सुरेंद्र शंकरशेट- अध्यक्ष नाना शंकरशेट(मुरकुटे) प्रतिष्ठान, सतिष पितळे-विश्वस्त शंकरशेट प्रतिष्ठान, मोहन चोणकर, दमागर घुले-प्रशासकीय अधिकारी,  नितीन दोशी- सहअभियंता, मीनल जुवाटकर, उदय बने, संजिवनी कापसे-अधीक्षक शहर शाखा,जयंत करंजगावकर, यांच्या सह  कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


No comments