web-banner-lshep2024

Breaking News

तालुका कृषी अधिकारी पोपट कांबळे यांनी शेतकर्‍यांच्या शेतात फिरवला परदेशी ट्रॅक्टर,शेतकरी हवालदिल...

BY, गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड
गेले 3 वर्षे मुरबाड तालुका कृषी अधिकारी पोपट कांबळे यांनी आत्मा योजना,मजगी,शेती नुकासान भरपार्इ,एम.आर.इ.जी.एस,फलोधान,फळबाग नर्सरी,बंधारे लुज बोर्डर कार्यालयभाडे पट्टी,शिबीरे,भतगिरणे,खते अशा अनेक शासकीय योजनांच्या कामात कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे.त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी मुख्यमंत्री यांचेकडे केली होती त्याची चौकशी आत्माविभागाचे कोलते नावाच्या अधिकार्‍यांनी केली.प्रत्यक्षदर्शी पुरावे घेतले मात्र त्याच भ्रष्टाचारात चौकशी अधिकारी कोलते हे कांबळे यांच्यात सहभागी असल्याने त्यांनी उपविभाग कल्याण,जिल्हा तालुका कृषी अधिकारी,कोकण कृषी संचालक यांच्याशी संगणमत करून शासनाला खोटे अहवाल सादर केला परंतू ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी पुन्हा मुख्यमंञ्याकडे फेरचौकशीची मागणी केल्याने तालुका कृषी अधिकारी पोपट कांबळे याला सक्तीच्या रजेवर घलवून स्वतंत्र पथकाद्वारे मुरबाड तालुक्यातील कृषी विभागाच्या कामांची चौकशी 21 मे 2018 पासून सुरू केली आहे.हा चौकशी पथक शासकीय विश्रामगृहात राहण्यास असून त्यांना कृषी सहाय्यक मुरबाड,टोकावडा व अन्य कृषी अधिकार्‍यांनी ठराविक कामे दाखवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे.शासनाने प्रत्यक्षदर्शी शेतकर्‍यांच्या शेतात जावून त्यांचे जबाब,पंचनामे घ्यावीत व ठेकेदार अधिकार्‍यांवर कारवार्इ करावी अशी मागणी नामदेव शेलार यांनी केली आहे.तसेच खुटल नर्सरी येथील इमारती रस्ते यांची कामे न करता लाखो रूपये काढले आहेत त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी व सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता यांचाही समावेश आहे.

No comments