web-banner-lshep2024

Breaking News

पंचायत समितीच्या आरोग्य लघूपाठबंधारे विभागातही बोगस कामे

BY, कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड
 जिल्हापरिषद पंचायत समिती मुरबाड यांच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेली आरोग्य अधिकारी बनसोडे यांनी बोगस डॉक्टरांना,रूग्णालयांना वाचवण्यासाठी मोठया आर्थिक उलाढाली केल्या आहेत.त्यांनी मुरबाड तालुक्यातील डॉक्टर,रूग्णालय,मेडीकल यांची चुकीची माहिती मुख्यमंञ्यांच्या व जिल्हाधिकारी ठाणे यांच्या चौकशी आदेशाला दिले असून रूग्णालयाची चौकशी तहसिलदाराकडून करण्यात आली त्यांचा अहवाल दडपला आहे.तसेच मुरबाड तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा खिळखिळी केली आहे.उपोषणाला ठेंगा दाखवत येथील आरोग्य केंद्रात लोकांना शासकीय सेवेचा औषधोपचार मिळत नाहीत.तेथील रूग्णालयात येणारी औषधे खाजगी मेडिकल,रूग्णालयात विक्रीला जात असल्याचा संशय असून त्याची चौकशी कख्न संबधीत आरोग्य अधिकार्‍याला निलंबीत करावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.
                  बोगस डॉक्टरांची समिती फक्त नावाला असून साटेलोटे करणारे अधिकार्‍यांमुळे बोगस डॉक्टर आज तालुक्यात वावरत आहेत.याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला असे करत बोगस डॉक्टरांची पाठराखण चालू आहेत.ठाणेचे मुख्याधिकारी केम्पी.पाटील हे बोगस डॉक्टर समितीचे मुख्याधिकारी असून त्यांच्या कारवार्इला दिरंगार्इ होते कि जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते असा सवाल विचारला जात आहे.
तसेच लघूपाठबंधारे विभागाने कृषी विभागाच्या बंधार्‍यावर नविन बंधारे दाखवून तसेच फार्महाऊस धारकाकडून लाखो रूपये घेऊन त्यांना बंधारे बांधून दिले आहेत.देवराळवाडी डॅम परिसर,तुळर्इ अन्य ठिकाणी बंधार्‍यांच्या कामात लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे.त्याचबरोबर कृषी विभागातून आदिवासी व गोरगरिबांना योजनांचा यांत्रिक साहित्यांचा लाभ न देता त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला आहे त्यांची चौकशी व्हावी.

No comments