मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम पाठबंधारे,आरोग्यसह सर्वच विभागात कोटीचा भ्रष्टाचार
BY, नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लार्इव्ह -भिवंडी :मुरबाड
ठाणे जिल्हा परिषदेच्या आंतर्गत येणार्या मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम आरोग्य,लघूपाठबंधारे,कृषी,रोजगारहमी,ग्रामपंचायत,बालकल्याण समिती अन्य सर्वच विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.त्यांची चौकशी स्वतंत्र समिती पथक नेमून करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
गेल्या 3 वर्षात बांधकाम पंचायत समितीचे उपअभियंता घुगे व त्यांचे सहकारी शाखा अभियंता यांनी रस्ते,इमारती,शाळ,संरक्षण भिंती,शौचालय,गटारी,स्मशानभुमी,काँक्रेटीकरण,समाजहॉल अशा विविध कामे काही ठिकाणी निकृष्ठ दर्जाची व काही ठिकाणी कामे न करता शासनाचा निधी हडप केला आहे.त्यांना सत्ताधारी व विरोधकांणी आपल्या ठेकेदारांना पोसण्यासाठी अधिकारी वर्गाला पाठबळ दिला आहे.त्यांचा परिणाम ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेच्या विकासावर झाला आहे.शासनाने प्रत्येक गावातील विकासकामे शासकीय योजनांची चौकशी स्वतंञ्य समिती नेमून करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

No comments