web-banner-lshep2024

Breaking News

आमदार किसनराव कथोरे मुरबाड विकासमंचाच्या जनार्दन तांबे यांची दापोली संघटक पदी निवड

BY, कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - दापोली - 
रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन तांबे यांनी आपले आयुष्य समाजसेवेला अर्पण केले आहे.जनार्दन तांबे यांनी विभागात जठील समस्या होत्या तेव्हा विविध समस्यापासून येथील नागरिकांना मदत केली.नेहमी आपल्या कुटूंबातील सदस्य म्हणून त्यांच्या मदतीला एका हाकेत धाऊन जाणारे ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन तांबे यांनी कधीही स्वतःचा विचार न करता जनसामान्यांचा विचार केला.प्रत्येकाच्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी सदैव पुढाकार म्हणून त्यांची ख्याती दापोली तालुक्यासह रत्नागिरी जिल्हयात सर्वांना माहितीच आहे.त्यांनी त्यांच्या आयुष्यात माणसाला महत्व दिला असून माणसातच देव असतो असे एकनिष्ठवंत जनार्दन तांबे यांनी आपल्या समाजकार्याचा ठिसा तळागळातुन जिल्हयात उमटवला आहे.

त्यांनी केलेल्या समाजसेवेत त्यांनी विविध पुरस्कार मिळाले असून त्यांच्या धडाडी कार्याला पाहून त्यांची आमदार किसनराव कथोरे मुरबाड विधानसभाक्षेत्र विकासमंच ट्रस्टच्या वतीने त्यांची दापोली संघटक पदी निवड करण्यात आली.त्याचबरोबर दापोली रत्नागिरी संघटक म्हणून प्रविण तांबे यांचीही निवड करण्यात आली. .त्याचबरोबर केदार नार्इक व सौ.सरिता नार्इक यांची अहमदाबाद प्रमुखपदी संघटक तर घोडकर यांची गुजरात राजस्थान प्रमुखपदी संघटक पदी निवड करण्यात आली आहे.यावेळी संस्थापक श्री.नामदेव शेलार,महाराष्ट्र अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार,खजिनदार श्री.मिलींद दळवी,महिला उपाध्यक्षा सौ.दिपाली दळवी,तसेच विजय डोंगरे व अन्य विकासमंचाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्ती पत्र व सन्माणपत्र प्रदान केले

No comments