web-banner-lshep2024

Breaking News

भारताचे माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी ठाणे येथे साजरी ....

BY, कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - ठाणे - 
भारताचे माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त नौपाडा मुन्ना रेसेटे,येथे ठाणे शहर काँग्रेस कमिटी 7 च्या वतीने कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी शालेय लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सुमन अग्रवाल यांनी स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुष्पहार घालून वंदन केले व त्यांच्या कार्याबद्दल शालेय मुलांना मार्गदर्शन केले.यावेळी याच व्यासपिठावर पाहुणे म्हणून ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे मनोज शिंदे,प्रदेश सदस्य राजेश जाधव, व मोठया संख्येने विद्दयार्थीवर्ग,नागरिक,काँग्रेसचे नेते,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन अ‍ॅड.इंद्रजीत कुलकर्णी यांनी केले तसेच घोलप यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

No comments