( इफेक्ट ) संपादक कुणाल शेलार यांच्या लेखणीचा ; अखेर शासनानी घेतली बातमीची दखल अन काढला नवा जी.आर
BY,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मंत्रालय
सा.स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्रात आपलं सरकार पोर्टल सेटलमेंट सरकार या टार्इटने अख्या महाराष्ट्रातील नागरिकांनी आमच्या वृत्तपत्राला प्रथम धन्यवाद दिला व तक्रारदाराची दिशाभुल करून भ्रष्ट अधिकारी आपली तिजोरी भरत होते तेव्हा पारदर्शकपणे निर्भिड अशी लेखणी सा.स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्रांनी केली त्याबद्दल अभिनंदनही केले.
![]() |
| स्वप्नज्योती टार्इम्सचे संपादक कुणाल शेलार |
काही दिवसांपुर्वी सा.स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्रात आपल सरकार पोर्टल सेटलमेंट सरकार अशी बातमी प्रसिध्द केली होती.तक्रारदाराने तक्रार केली तर त्यामध्ये तक्रारदाराच्या तक्रारीचे निरासरण होत नव्हते.तक्रार करून खोटे अहवाल सादर केले जात होते.यामध्ये शासनाची व नागरिकांची दिशाभुल केली जात होती.याकडे स्वप्नज्योती टार्इम्सचे संपादक कुणाल शेलार यांनी निर्भिडपणे लेखणी करून शासनाला अनेक प्रश्नाने जाब विचारला होता.त्यावर केंद्र सरकारनी लक्ष घातले व त्यावर एक नवीन जी.आर आमलात आणला.यामध्ये सा.स्वप्नज्योती टार्इम्सच्या लेखणीमधल्या काही प्रश्नांचा समावेश आहे.या जी.आर मध्ये महात्वाचा निर्देश दिला आहे.वृत्तपत्रात विविध प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे असा होता की,ज्या अधिकार्यांविरोधात तक्रार आहे त्याच अधिकार्याकडे तक्रारीचा तपास असायचा आणि त्या तपासात तो स्वतःला वाचवून खोटे अहवाल सादर करायचा परंतू जेव्हा सा.स्वप्नज्योती टार्इम्सने गांभिर्यतेपने याकडे लक्ष घातले तेव्हा पारदर्शक सरकारचे एक पाऊल पुढे पडलेच,ज्या अधिकार्याविरोधात तक्रार प्राप्त झाली त्या अधिकार्याच्या तक्रारीच्या चौकशीसाठी स्वतंत्रपणे प्रकरणे हाताळण्याचे जी.आर मध्ये नमूद केले असून एखादया तक्रारदाराचे निराकरण झाले नाही तरी त्या तक्रारीचा विचार केला जात नव्हता असाही प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून विचारला असता त्यावरही केंद्र सरकारने निराकरण उत्तर प्राप्त झाल्यास त्यावर पुन्हा फेरचौकशी पध्दतीने काळजीपुर्वक तपासणी करण्याचेही या जी.आर मध्ये नमूद केले आहे.अशा अनेक प्रश्नावर केंद्र सरकार समवेत महाराष्ट्र सरकार ्नी जी.आर मध्ये महत्वाचे प्रश्नाचा विचार केला आहे. संबंधित तक्रारीसाठी भ्रष्ट असलेला अधिकारी आता आपला खिसा भरू शकणार नाही असे या जी.आर वरून दिसून येते परंतू येणारा वरिष्ठ अधिकारी तपासकामी अंतर्गत त्या अधिकार्यांसमवेत सामील झाला तर हाही विचारपुर्वक प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
विविध घडामोडी आमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून तमाम जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करते.काही जनसामान्यांच्या तक्रारी,त्यांच्या समस्या,बेरोजगारी,भ्रष्टाचार,शासकीय योजनाच्या लाभात गैरव्यवहार, अशा अन्य बाबींवर सा.स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्राचे कार्य चालूच आहे.निर्भिड,निपक्ष असलेला हा तीन भाषीय वृत्तपत्र विविध लेखणी,सत्याचे परखड मत,प्रसिध्द करतच आहे.त्या लेखणीनेच आज केंद्र सरकारला जी.आर काढावे लागले त्याबद्दल आम्ही केंद्र व महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो.



No comments