web-banner-lshep2024

Breaking News

स्थानिक गुन्हे शाखेचे (लोकल क्रार्इम ब्रांच) कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक मा.श्री.व्यंकट आंधळे साहेब

BY, कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड  - 
'' सद्रक्षणाय खलनिग्रहणाय '' या वाक्यातच महाराष्ट्र पोलिसबाणा त्यांच्या निर्भिड,धडाकेबाज कार्यातुन दिसून येते.आज सर्वसामान्य रात्री शांतपणे झोपतो ते केवळ महाराष्ट्र पोलिसांमुळेच.असेच निर्भिड बाणा आणि कर्तव्यदक्ष म्हणून शासनाचे पालन करत सर्वसामान्यांच्या हाकेला धाऊन जाणारे आपल्या सर्वांचे स्नेही स्थानिक गुन्हे शाखेचे (लोकल क्रार्इम ब्रांच) पोलिस निरीक्षक मा.श्री.व्यंकट आंधळे साहेब.
गुन्हेगाराला आळा घालून गुन्हेगारी मोडीत काढणारे मा.व्यंकट आंधळे साहेब यांनी टिटवाळा येथे आपला पदभार ज्या वेळेस स्विकारला होता तेव्हा टिटवाळयामध्ये अवैध धंदे,चोरी,खुण,लुटमारी,सर्वसामान्यांच्या तक्रारी यावर पहिले लक्ष घातले.त्यांच्या कर्तव्यदक्षाची अमुल्य कामगिरी महाराष्ट्र पोलिसांना गर्वाची बाब ठरली आहे.रात्रीची वेळ असो किंवा दिवसा,नेहमी वेळोवेळी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांची कामगिरी चांगल्या पध्दतीने,आपल्या कुशल बुध्दीनी,निर्भिडपणाने बजावली.बरेच ठिकाणी त्यांनी गुन्हयांचा तपास लावला.कित्येक गुन्हयांचा सडतोड करून तपास करून गुन्हेगारीला आळा घालून काही तासातच जेरबंद करून घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करत गुंडेगिरी संपविली.
सामाजिक बांधिलकी जोपासित शासनाच्या नियम अटी यांच्याशी कटीबध्द म्हणून त्यांनी प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनात घर निर्माण केले आहे.त्यांच्या कार्याला पाहून नागरिकांच्या मनात असलेल्या पोलिसांबद्दलच्या विविध विचारांना अखेर चुकीचे असल्याचे स्वतःच्याच नजरेत दिसून आले.कारण जर असे कर्तव्यदक्ष महाराष्ट्र पोलिस आपल्या महाराष्ट्रात,भारतात आहेत तर कुठे तरी आपणच चुकत असु असे वाटू लागले. मा.व्यंकट आंधळे साहेबांची भुमिका परखड असून त्यांनी नेहमी सत्याची साथ दिली आहे.त्यांच्या कडे येणार्‍या व्यक्तीचा ते नेह़मी आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून सन्मान करतात.असे मा.व्यंकट आंधळे साहेब आज स्थानिक गुन्हे शाखेचे (लोकल क्रार्इम ब्रांच) मुख्य पोलिस निरीक्षक म्हणून आपला कार्यभार जेव्हा स्विकारतात तेव्हा ठाणे जिल्हयातील भ्रष्टाचार संपविण्यात आणि अवैधधंदे,खुण,चोर्‍या,लुटमारी करणारे तसेच गुंडगिरीतील गुंडही 10 वेळा विचार करतो की,गुन्हा करू कि नको,केल्यास आंधळे साहेब आपले काय करतील? म्हणून अशा कर्तव्यदक्ष महाराष्ट्र पोलिसामुळे गुन्हेगारीला कित्येक गुंडाणी टाळे ठोकले आहे. मा.व्यंकट आंधळे साहेबांच्या आयुष्यात कित्येक केसेस आल्या,संकटेही आली परंतू माघार हा शब्द त्यांच्या डायरीत नसल्याने नेहमी आपली भुमिका निर्भिडपणे बजावली आणि त्यांना ते सामोरे जात कित्येक गुन्हेगारांनी केेलेल्या पापाची शिक्षा करून दिली.आज व्यंकट आंधळे साहेबांचे नाव एैकल्यावर गुंड आपली वस्ती सोडून निघून जातो अशा महाराष्ट्राच्या पोलिसाला सर्व महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा.

No comments