BY,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - उल्हासनगर -
उल्हासनगर 04 येथिल लालचक्की चौकाजवळ काही वेळापुर्वी एका भरधाव कारचा तोल गेल्याने चौकाजवळील विद्दयुत पोलाला जाऊन धडकली आहे.सुदैवाने कोणत्याही प्रकारे जिवीतहाणी झाली नाही.
 |
( छायाचित्रकार : अभिजीत चंदणशीव )
|
|
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन गाडी चालकाला ताब्यात घेतला आहे.गाडी एवढया वेगाने होती की,विद्दयुत पोल हा वाकला गेला आहे.तर कारचा पुढिल भाग हा पुर्णतः बँड झाल्याचे सुत्रांनी कळविले आहे.घटना घडली तेव्हा मोठया संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती.गाडी चालकाला पोलिस ठाण्यात नेण्यात आले असल्याचेही कळण्यात आले.
 |
| ( छायाचित्रकार : अभिजीत चंदणशीव ) |
गाडीचा व विद्दयुत पोल वाकल्याचे चित्र आमचे छायाचित्रकार अभिजीत चंदणशीव यांनी टिपले असून कोणत्याही प्रकारे गाडी चालकाला दुखापत झाले नसल्याचेही अभिजीत चंदणशीव यांनी सांगितले.
No comments