मुरबाड तहसिलदार कार्यालयात चक्क बंद असलेल्या पिण्याच्या पाणीच्या फिटरजवळ घाणीचे साम्राज्य ; थुंकून केली रंगरंगोटी ; तहसिलदार सचिन चौधर यांचे दुर्लक्ष
BY, विशेष प्रतिनिधी,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड -
मुरबाड तहसिलदार कार्यालयामध्ये युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीला काही नागरिकांनी तहसिलदार कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय व पिण्याच्या पाण्याजवळ थंकून रंगरंगोटी करून घाणीचे साम्राज्य असल्याची तक्रार केली असून चक्क तहसिलदार सचिन चौधर यांच्याच ऑफीस समोरिल ही घटना असल्याने पिण्याचे फिटर खराब झाल्याने गावापाडयातून येणार्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे.त्यामुळे 20 रूपयाची पिण्याची बॉटलवर खर्च करावे लागत आहे.
![]() |
| पिण्याच्या पाण्याजवळ थंकून रंगरंगोटी करून घाणीचे साम्राज्य |
फिटर बंद असल्याने फक्त देखावासाठी असून चक्क त्याच फिटरजवळ घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे.मुख्य तहसिलदारांच्या समोरच पिण्याचे पाणी फिटर बंध तसेच थुंकून घाणीचे साम्राज्य असल्याने त्याकडे लक्ष द्दयायला वेळच मिळत नसल्याची तक्रार आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्हकडे केली असता तात्काळ मुरबाड तहसिलदार कार्यालयामध्ये स्वतः आमचे सि.र्इ.ओ कुणाल शेलार यांनी पाहणी केली असता ही गैरसोय बाब निदर्शनास आली व तात्काळ नायब तहसिलदार बंडू जाधव यांची भेट घेऊन सदरील गैरसोय बाब त्यांना सांगितली असता त्याकडे तात्काळ लक्ष घालतो असे सांगितले परंतू आज पुन्हा पाहणी केली असता त्यांच्याही फुका वार्यावरच राहिल्याने आजही पिण्याच्या पाण्याची गैरसोय ही नागरिकांना प्रशासकीय विभागात भेडसावत असल्याने घाणीचे साम्राज्य तसेच असल्याने तहसिलदार सचिन चौधर यांचे दुर्लक्ष झाल्याने हा गैरसोयीचा प्रकार उघड झाला आहे.
![]() |
| तहसिलदारांच्या समोरच पिण्याचे पाणी फिटर बंध तसेच थुंकून घाणीचे साम्राज्य |
जलशिवारांसाठी आमच्या तहसिलदारांना पाहणी करण्याचा वेळ मिळतो परंतू त्यांच्याच ऑफीस स़मोरील घाणीचे साम्राज्य व बंद असलेल्या पिण्याच्या पाणीचे फिटरकडे लक्ष देता येत नाही अशा प्रतिक्रिया सदर नागरिकांच्या उमटत आहे.याकडे आता उपविभाग अधिकारी व जिल्हाधिकारी लक्ष घालतील का ? असा प्रश्न येथिल नागरिक करत आहे.




No comments