web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड तालुक्यातील सर्व पेट्रोलपंपाची चौकशी करा - कुणाल शेलार

BY,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड 
 मुरबाड तालुक्यामध्ये कित्येक पेट्रोलपंप आहेत.त्यांची मुरबाड तहसिल कार्यालयामधून कोणत्याही प्रकारे चौकशी केली जात नसल्याने पेट्रोलमध्ये अफरातफर केली जात असल्याच्या मुरबाड नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गाडीमध्ये पेट्रोल टाकला जातो परंतू पेट्रोल कमी टाकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या ठिकाणी पेट्रोलपंपाच्या निरीक्षणासाठी तसेच तक्रारीसाठी पर्यवेक्षक अधिकारी नसल्याने याचा फायदा पेट्रोलपंप वाल्यानी घेतला असून प्रशासकीय अधिकार्‍यांचा पाठिंबा असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे तरी मुरबाडच्या सर्व पेट्रोलपंपाची सखोल चौकशी करून मुरबाड तहसिल कार्यालयामध्ये पेट्रोल पर्यवेक्षक अधिकार्‍याची नेमणूक व्हावी अशी मागणी कुणाल शेलार यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

No comments