web-banner-lshep2024

Breaking News

द ग्रेट समजणारे मोदीजी,अमित शहाजी,राहुल गांधीजी तुमच्या गुजरात,अहमदाबाद पेक्षा आमचा महाराष्ट्र चांगला - कुणाल शेलार

BY,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - अहमदाबाद 
अहमदाबाद गुजरात हद्दीतील अंबाजी मंदिर हा सर्व भक्तांना परिचयाचा आहेच.या मंदिरामध्ये मोठया प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी बाहेर राज्यातून महाराष्ट्रातून येत असतात.दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या असतात.परंतू या देवीच्या दर्शनासाठी भक्तगणाला पैसा मोजावा लागत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.दर्शनासाठी हार,चुनरी,नारळ प्रसादाच्या थाळीची किंमत भरमसाठ लावून नागरिक भक्तगणाची लूटमार चालू असून आपल्या देशाचे पारदर्शक पंतप्रधान मोदी,भाजपाध्यक्ष अमित शहा,काँग्रेसध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघातील हा भाग महत्वपुर्ण मानला जात असून महाराष्ट्रातील समस्या,अडचणी,फसवेगिरी,लूटवेगिरी,भ्रष्टाचार संपविण्याचा नारा लावणारे त्यांच्याच मतदार संघात मोठया भरमसाठपणे नागरिक भक्तगणाची लूट त्यांच्या डोळयासमोर असून संपवता आली नाही.त्यांनी महाराष्ट्रातील फसवेगिरी,भ्रष्टाचार,लुबाडगिरीच्या आपल्या कार्यातून शब्दाची भाषा काढू नये.मग तुमच्यापेक्षा आमचा महाराष्ट्र चांगला आहे सगळे काही जरी चालत असले तरी देवै दैवताच्या नावावर पैसे तरी कमवत नाही.बरेच ट्रस्ट दैवी देवतांचे आहेत परंतू त्यापेक्षा आम्ही अन्नदान तरी करतो तेवढं तुम्हाला शक्य पण होणार नाही.आमच्या महाराष्ट्राकडे बघण्याअगोदर आपल्याच मतदार संघातील अंबाजी मंदिराकडे लक्ष घाला.तेथील दैवी देवताच्या नावावरील लुबाडगिरी बंद करा,जबरदस्ती नागरिकांना आपल्या खिशाला चाप बसून देणारे तुमचीच माणसं दैवी देवतांच्यावर नावावर पैसा कमावून गरिबांची लयलूट करत आहे त्याकडे प्रथम बघावा असा माझा आपल्याला सल्ला आहे.
दर्शनासाठी भक्तगणाला 1200,1500 ते 2000 रूपयाच्या दैवी देवतांची साहित्य सामुग्री सांगून फसवेगिरी करणार्‍यांकडे कानाडोळा करू नये,भक्तगणाला दैवी देवतांसाठी 2000 रूपये मोठी रक्कम वाटत नाही परंतू लूबाडगिरी करणार्‍या तुमच्याच मतदार संघात आधी लक्ष घातले तर बरे होर्इल,मग आमच्या महाराष्ट्राकडे बोट दाखवा.33 कोटी देव आमच्या महाराष्ट्रातही आहेत परंतू भक्ती आणि श्रध्दा आम्हाला अंबाजी दैवीकडे खेचत नेते त्याला इलाज नाही.आमच्या महाराष्ट्रात फसवेगिरी,लुबाडगिरी चालत नाही कारण आम्ही माणस जपतो पैसा नाही.स्वतःला पारदर्शक समजून कोणी ग्रेट होत नसतो तर त्यांच्या कार्यातून त्यांचे महान कार्य दिसून येते असे मी मानतो म्हणून " जर असेल दम तर अंबाजी दैवीच्या नावाखाली लुबाडगिरी,फसवेगिरी करा कम " हा माझा मोदीजी,शाहजी,गांधीजी आपल्याला महाराष्ट्राच्या या तरूणाकडून मोफत सल्ला आहे.

No comments