web-banner-lshep2024

Breaking News

विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणी करीता रस्ता रोको

BY,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - कळंब 
तालुक्यातील अंदोरा येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणी करीता आंदोरा येथील शेतकरी व ग्रामस्थांनी रस्ता रोको करन्यात आला त्यामुळे काहीतास वाहनांची कोंडी झाली होती. 
 मागणीचे निवेदन अंदोरा ग्रामस्थांनी दिनांक ४ मे रोजी तहसिलदार यांना दिले होते परंतु यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्यामुळे  पी. जी नाना. तांबारे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ११ मे रोजी कळंब येरमाळा रोड वरील अंदोरा गावा गावात  सकाळी ९ ते ११.३० पर्यत रस्ता रोको करण्यात आला आहे.
यावेळी महावितरण चे कनिष्ट अभियंता राऊत यांनी अश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको थांबवण्यात आला आहे.
यावेळी मोठ्याप्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती.

No comments