web-banner-lshep2024

Breaking News

चहा बिस्कुटआरोपाची कॉपीराईट पत्रकारांच्या नेत्यांकडून अपेक्षा भंग;निर्भीड पत्रकारितेचा मात्र मोठा बळीच सर्वांना गृहीत धरून पोटभरणी नको..!

 

नामदेव शेलार / मुरबाड : सोशल मीडियावर पत्रकारितेचा नवा कायदा आणि एआय कॉपीराईट पत्रकारिता मेसेज फिरताना अनेक निर्भीड आणि संघटित पत्रकारांनी त्यावर भाष्य केले असल्याचे नजरेस पडले आहे मात्र लोकशाहीच्या स्वातंत्र्याचा संरक्षण गुलदस्त्यातच आहे.एआय आणि कॉपीराईट पत्रकारितेने मथळ्यातून बातमी काढून चहा बिस्कुटचा शिक्कामोर्तक केला.दुसरीकडे कालच्या दिल्याने आम्हाला शहरातील आजी-माजी देतात पण तालुक्यातून तुमचे पाहुणे नेते देत नाहीत. त्यांना सांगा ना साहेब अशी साद घातली.साऱ्यांना गृहीत धरून देतात आम्हाला हा शब्द जरा चहा बिस्कुट आणि कॉपीराईटला प्रोत्साहन देणारा ठरेल. म्हणून निर्भीडतेची तलवार केक चालली आणि वाटाचा दिवस साजरा झाला.

आपुलकीची चादर अंगावर घ्यावी मात्र खालची घोंगडी माखलेली नसावी अशी अवस्था ज्यांची आहे. त्यांना लोकशाहीच्या स्तंभात नवे नेता पाहुणे दाद देत नसतील पण निर्भीडतेच्या लेखणीने मोठ्या सुब्या-आन्या-मोन्या पासून दीपकही पणत्या मध्ये जळताना दिसतो. तो फक्त सामान्यांच्या समविचारी चौथ्या खांबाखाली मग कोणी अपेक्षा केली. साऱ्यांचा त्याच्याशी काय संबंध आपलीच आपण मारून नेली आणि शुभ दिपावली...

चौथ्या खांबाचे मानकरी आणि मारेकरी यामधील संवाद सार्वजनिक असावा आणि ही साऱ्यांचे पाहुणे येर झरा शाळी वारा जो देईल त्यांचे तोंड भरून कौतुक साजरा दीपावली दसरा...स्वबळाचा संघर्ष ज्यांच्या निर्भीडतेमध्ये तोच अन्यायाची तलवार बनू शकतो. मात्र सर्व पत्रकारांना गृहीत धरून पोटभरणी करणारा शेवटी ज्यांच्या त्यांच्या नजरेत चहा बिस्कुट वालाच ठरतो.

त्यामध्ये निर्भीड अखंड सडेतोड ज्वलंत पत्रकारितेच्या लेखणीने मात्र मोन्या शेवटी बळीच जातो. दीपावली ठीक असता आपुलकीच्या भेटीगाठी चढवून घेताना उंबरठ्याच्या पायऱ्या तेवढ्यापुरत्या सोप्या असत.त जेव्हा उतरताना दम लागतो. तेव्हाच त्याचा हिशोब लागतो. अशा पत्रकारिता आणि नेत्यांमधील सहवास सणासुदीला महाग ठरतो. अशीच दीपावली साजरी होत आहे.

शुभेच्छा टाईमापुरता असतात मिठाई गोड असते पॉकेट फोडल्यावर उठण्याचा वास येतो खऱ्या पत्रकारितेचा पत्रकारालाच भाष होतो.कोणाच्या उबरट्यावर नाही. आम्हाला कोणी देण्याचा आणि घेण्याचा प्रश्नच नाही. आपुलकीने वाजले फटाके अहिऱ्या गैर्यांना भीक घालत नाही. धमकी बदनामीची आमची भाऊबीज आहे. कफन बांधून फिरणाऱ्या जनसेवक पत्रकारांना समस्नाची भीती नाही.पेनामध्ये संविधान टाकत आहे.त्यानीच दिलं वरदान निर्भीड पत्रकार कोणा समोर नतमस्तक होतो पण स्वाभिमान बाजूला ठेऊन कधी वाकत नाही.सारे एका माळेचे मणी आपण सुद्धा आपल्या धाग्यात बांधून राहू आठवणी ताज्या नेहमी हसत खेळत पुढे जाऊ…..

 शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा - नामदेव शेलार

No comments