आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते न्याहाडी पुलाचे उद्घाटन;बनावट घरपट्टी बनवणाऱ्यांची नावे फलकावर लावण्याचा इशारा..!
नामदेव शेलार/ मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघात स्वप्नात
नसलेला सार्वजनिक विकास प्रकल्प होत आहेत प्रत्येकाला न्याय देण्यासाठी शासन
दरबारी पाठपुरावा करत असताना काही जण चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरवतात त्यांनी
विकासासाठी एकत्र येऊन माझ्यासोबत काम करावे असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी
मोरोशी न्याहाडी पुलाच्या उद्घाटन वेळी केले आहे.
काळू नदीवरील न्याहाडी मोरोशी पुलासाठी सात कोटी रुपये मंजूर
निधीच्या पुलाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झाले यावेळी काळू धरण
माझ्या कालावधीत मंजूर झालेला नसताना मी स्थानिक शेतकऱ्यांच्या सोबत आहे परंतु
ज्यांनी काळू धरणाची एजंटगिरी केली तेच मोर्चे काढत आहेत स्थानिक लोकप्रतिनिधीवर
असूड ओढतात काहीशेतकरी नाहीत मात्र शॉसळमीडिया वर कमेंट करतात विरोध करणाऱ्यांनीच
बोगस घरपट्टी बनवल्या आहेत. त्याची चौकशी लावून त्यांची नावे फलकावर लावतो असा
इशारा दिला.
काही लोकांनी काळू धरणासाठी पुलाची उभारणी असा मेसेज सोशल
मीडियावर टाकून पुलाला विरोध केला अशांना चौकात जाब विचारला पाहिजे येथील
गावकऱ्यांनी असे सांगून चांगल्या विकास प्रकल्पाने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे
विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले आमदार किसन कथोरे यांच्या
कालावधीत मुरबाड तालुक्यात काँक्रिटी रस्ते आरसीसी स्मशानभूमी पूर्वी एकही गावात
मुस्लिम कब्रस्तान नव्हता माझ्या कालावधीत प्रत्येक मुस्लिम वस्तीला कब्रस्तान
दिला पाणी, वीज,शाळा, रस्ते,संगमेश्वर,येथील पुरातन शिवमंदिर, मराठा समाजाला, समाज हॉल काचेचा पूल विविध प्रकल्प
मार्गी लागत आहेत बारवी डॅम मध्ये 1200 मुला-मुलींना प्रकल्पग्रस्त म्हणून नोकऱ्या दिल्या हा पॅर्टन महाराष्ट्रात
पहिला नंबर ठरला आहे.
मी मतदानासाठी काम करत नाही ज्यांनी ठेकेदारीने पैसा कमविला
त्यांनी मला मतदान केले नाही माझा मतदार सामान्य नागरिक आहेत. चांगल्या माणसाच्या
बरोबर माझं नेहमी संपर्क राहिला आहे शाही गावातील एका गरीब शेतकऱ्याचा घरकुल
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडला त्याचा समाचार घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार
असे सांगितले थीदवी फाट्याजवळ भव्य वारकरी भवन उभारण्यात येत आहे. तेथे प्रत्येक मार्गस्थ दिंडीतील भाविकांना चहा नाश्ता जेवण राहण्याची
सोय मोफत केली जात आहे.
असेच माळशेज घाट
रस्त्यावर सुकामेवा भाजीपाला फळे कंदमुळे विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांना
सुसज्ज स्टॉल उभे करून देणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले यावेळी
पुढे पुढे करणाऱ्या तसेच ठेकेदारीसाठी येणाऱ्यांवर संताप व्यक्त करून चांगल्या
कामांना चांगली प्रसिद्धी दिल्यास मुरबाडच्या विकासात अधिक भर पडेल चांगल्या
प्रकल्पांना विरोध नको माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी मी नेहमी दोन पाऊले पुढे आहे
असेही कथोरे यांनी भाषणात सांगितले.



No comments