web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडच्या मातीतून घडावेत IAS-IPS अधिकारी! IRS समीर वानखेडेंचे तरुणांना सडेतोड आवाहन

 

रामदास पष्टे / मुरबाड : महाराष्ट्रातील मराठी तरुणांनी यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षांबाबत जागरूक होऊन अधिकाधिक तरुणांनी प्रशासकीय सेवेत यावे, असे आवाहन IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी केले. देवा ग्रुप (Deva Group) फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

यावेळी वानखेडे यांनी स्वयंअभ्यास, नियमित वृत्तपत्र वाचन, अभ्यासाचे नियोजन आणि सातत्य यांचे महत्त्व स्पष्ट केले. महागड्या क्लासेसशिवायही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यूपीएससीमध्ये यश मिळवता येते, असे सांगत या परिसरातून किमान पाच IAS-IPS अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देवा ग्रुप फाउंडेशनच्या या केंद्रात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, इंटरनेट सुविधा, सुसज्ज ग्रंथालय आणि मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे, फाउंडेशनचे सचिव तानाजी मोरे, अध्यक्ष सुजित (पप्या) ढोले, बदलापूर नगरपालिका सभापती किरण भोईर, सौ. मनीषा तानाजी मोरे, चेतनसिंग पवार, सुहास मोरे, जितेंद्र भावार्थे, रवींद्र घोडविंदे सर, Adv सचिन चौधरी, स्वराताई चौधरी, युवा नेते अनिल घरत, सुरेश बांगर, मनोज देसले, किरण पडवळ, छोट्या पाटील आणि चेतन मोरे यांच्यासह देवा ग्रुप फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

No comments