मुरबाड तालुक्यात पीक पाहणी डीएससी प्रक्रियेला वेग
गौरव
शेलार / मुरबाड : जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी कल्याण वृषाली पाटील व मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख
यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा सध्या क्षेत्रीय स्तरावर
सक्रिय होऊन शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पीक पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष मदत करत
आहे. मुरबाड तालुक्यात पीक पाहणी डीएससी (डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र) करण्याच्या
प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. या प्रक्रियेदरम्यान नायब तहसीलदार अमोल शिंदे
तसेच ग्राम महसूल अधिकारी उपस्थित राहून पीक पाहणीच्या कामाचा आढावा घेत आहेत.
शेतकऱ्यांच्या पीक
पाहणीची नोंद अचूक आणि वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी
महसूल विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी
प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध माहितीची पडताळणी करत असून, त्यानुसार
डीएससी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
पीक पाहणीच्या नोंदी
शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजना, पीक विमा तसेच
कृषीविषयक लाभांसाठी महत्त्वाच्या असल्याने या प्रक्रियेला विशेष महत्त्व आहे.
त्यामुळे तालुक्यातील संबंधित अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी पीक पाहणीचे
काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.तहसीलदार अभिजीत देशमुख
यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाकडून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे पीक
पाहणीच्या नोंदी अद्ययावत होण्यास मदत होणार आहे.




No comments