उल्हासनगरमध्ये ७.४ किलो गांजा जप्त; आंध्र प्रदेशातील दोघांना अटक
शेखर
दळवी / उल्हासनगर : उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या
हद्दीत अमली पदार्थविरोधी कारवाई करत पोलिसांनी तब्बल ७ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त
केला आहे. या गांजाची अंदाजे किंमत ३ लाख ७० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी
दिली. या प्रकरणी आंध्र प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती
पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८०/२०२६ अन्वये NDPS
कायदा कलम ८(क), २०(ब), ii(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोलिसांनी राजू
नीलकंठम समरडी (वय ३५ वर्षे), रा. २-१२५, मधगडा, आरकु व्हॅली, जि.
विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश आणि वीरास्वामी चीनालिंगा
गुल्लोरी (वय ३० वर्षे), रा. बंड्डम, आरकु
व्हॅली, जि. विशाखापट्टणम, आंध्र
प्रदेश या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून
७ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा, अंदाजे ३ लाख ७० हजार
रुपये किमतीचा अमली पदार्थ, हस्तगत केला आहे. जप्त करण्यात
आलेल्या गांजासह दोन्ही आरोपींना संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील
तपास पोलीस करीत आहेत.सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये मपोनि शीतल बामणे, सपोनि योगेश माळी, पोहवा प्रमोद जाधव, सुजित भोजने, चंदू शिंदे, पोशि
कृपाल शेकडे, भूषण गावडे ,अतुल वाघमोडे
यांचा सहभाग होता.
उल्हासनगर परिसरात
अमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या
कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणातील
गांजा नेमका कोठून आणण्यात आला आणि तो कुठे वितरित केला जाणार होता, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

.jpeg)


No comments