web-banner-lshep2024

Breaking News

वैशाखरे येथे ३५० बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप

गौरव शेलार  / मुरबाड : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनजी कथोरे यांच्या माध्यमातून आणि प्रमुख उपस्थितीत नोंदणीकृत ३५० बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप वैशाखरे येथे करण्यात आले.

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याच अनुषंगाने वैशाखरे येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला सुभाषदादा पवार, सुहासभाऊ मोरे, प्रकाश पवार सर, गोविंदजी भला, गोल्हे सर, संतोष भांगरथ, काळूराम घोलप, रमेश उघडा, अनिल कवटे, विठ्ठल म्हाडसे, सदा शेलार, रोहित बोराडे, सुनील तुपांगे, किशोर राऊत, जयवंत खंडागळे, शिवराम थोरात, अजित घरत, दीपक घरत, विजय ठाकरे, दिनेश घरत, प्रमोद घरत, मनोज घरत, हिरामण नवले, महेश फोडसे, महेश घरत, गणेश साबळे, गणेश पारधी, बुधाजी पारधी, मनिषा सोंगाळ आणि अनिश शिद यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन अनिलभाऊ घरत व सीमाताई घरत यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या उपक्रमामुळे बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोंदणीकृत कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

 

No comments